पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. बीडमध्ये बुधवारी पेट्रोलचे दर 113.9 पैसे आहेत. बुधवारी 34 पैशांची वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात 33 पैशांची वाढ होऊन 116.53 रुपये दर झाले आहेत. तर डिझेलचे दर 36 पैशांनी वाढले असून 102.26 पैसे प्रति लिटर दराने विक्री सुरू आहे.
इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांना चांगलीच बसू लागलीय. दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असल्याने महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. खाजगी वाहनासह प्रवाशांची वाहतूक करणारे वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये दररोज वाद निर्माण होत आहेत. केंद्र सरकारने दररोज वाढणाऱ्या इंधन दर वाढीवर ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी सर्वसामान्य स्तरातून होत आहे.