झारखंडमधील सरकारची नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट

झारखंडने पेट्रोलच्या दराबाबत सामान्यांना दिलासा दिला आहे, झारखंडमधील सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. सोरेन सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे.

Update: 2021-12-30 02:38 GMT

मुंबई// देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज स्थिर आहेत. मात्र, आधीच पेट्रोल डिझेलच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की, सर्वसामान्य त्रस्त आहेत. इंधनाचा भाव कधी कमी होणार याच प्रतीक्षेत सर्वजण आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर एवढा आहे. दरम्यान, झारखंडने पेट्रोलच्या दराबाबत सामान्यांना दिलासा दिला आहे, झारखंडमधील सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. सोरेन सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे.

मात्र, हा दिलासा केवळ दुचाकी वाहनांसाठी असणार आहे. झारखंड सरकारला काल 2 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आता राज्यात दुचाकी वाहनांना पेट्रोलवर प्रतिलीटर 25 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. 26 जानेवारी 2022 पासून ही सूट दिली जाईल.दरम्यान रांचीमध्ये पेट्रोलचा दर 98.52 रुपये प्रति लीटर आहे, तर या शहरात डिझेल 91.56 रुपये प्रति लीटरवर आहे.

Tags:    

Similar News