भारतीय तेल कंपन्यांनी आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. आज डिझेलचे दर 34 ते 38 पैशांनी, तर डिझेलचे दर 30 ते 35 पैशांनी वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये याआधीच पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. देशात सतत वाढणाऱ्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य त्रस्त आहेत, अशातच पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 107.59 रुपये, तर डिझेलचे दर 96.32 रुपये प्रति लिटर एवढे आहेत. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 113.46 रुपये आणि डिझेलची किंमत 104.38 रुपये प्रति लिटर एवढे आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 108.11 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 99.43 रुपये प्रति लिटर आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 104.52 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 100.59 रुपये प्रति लिटर आहेत.
एकूणच काय तर पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलची वाटचाल देखील शंभरीकडे चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दरवाढीवरून राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहेत तर केंद्र सरकार राज्यांनी करात कपात करावी असं सांगत आहे. मात्र, या सर्वात भरडला जातोय तो सर्वसामान्य माणूस. त्यामुळे सरकार विरोधात जनसामान्यांचा रोष वाढत आहे.