पेट्रोल-डिझेलने बनवले एप्रिल फुल

पाच राज्यातील निवडणूकांनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढायला सुरूवात झाली. त्यातच गेल्या अकरा दिवसात नऊ वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. तर आज पेट्रोल डिझेलच्या दराने नागरिकांना एप्रिल फुल बनवले आहे.;

Update: 2022-04-01 05:10 GMT

पाच राज्यातील निवडणूकांनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढायला सुरूवात झाली. त्यातच गेल्या अकरा दिवसात नऊ वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. तर आज पेट्रोल डिझेलच्या दराने नागरिकांना एप्रिल फुल बनवले आहे.

1 एप्रिल रोजी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत असते. मात्र 1 हा दिवस एप्रिल फुल म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आज लोकांना एप्रिल फुल करत सुखद धक्का दिला आहे.

पाच राज्यांच्या निवडणूकांपाठोपाठ देशातील पेट्रोल, डिझेलसह घरगुती आणि व्यवसायिक गॅसच्या किंमतीही वाढताना दिसत आहेत. त्यातच गेल्या अकरा दिवसात नऊ वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या अकरा दिवसात इंधनाचे दर सहा रुपयांनी वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरांचा सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र आज एप्रिल फुल म्हणत इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत.

पेट्रोल डिझेल स्थिर, व्यवसायिक गॅस महागला

ढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त असताना आता एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मात्र ही वाढ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झाली आहे. त्यामुळे तुर्तास घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

22 मार्च रोजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घसरण झाली होती. मात्र त्यानंतर घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरूवात झाली. गेल्या अकरा दिवसात नऊ वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर आज नव्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच व्यवसायिक गॅसच्या ग्राहकांना गॅस दरवाढीचा धक्का बसला आहे.

आज गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे व्यवसायिक ग्राहकांना गॅस भरण्यासाठी मुंबईत 1 हजार 955 रुपयांऐवजी 2 हजार 205 रुपये मोजावे लागणार आहेत.

याआधी व्यवसायिक गॅसच्या किंमतीमधील चढउतार

ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत व्यवसायिक गॅसच्या किंमतीमध्ये 170 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2022 ला गॅसच्या दरात घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा गॅसच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे.

Tags:    

Similar News