पेट्रोल डिझेल ने सोन्या, चांदीची मस्ती उतरवली, सुबोध भावे चा मोदी सरकारवर निशाणा
मनमोहन सिंह सरकारच्या काळात महागाई विरोधात बोलणारे अभिनेते मोदी सरकारच्या काळात गप्प असताना सुबोध भावेने जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवल्याने त्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे....
पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किंमतीने जनता त्रस्त झाली आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल डिझेलने शंभरी पार केली आहे. तर गॅसच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य लोकांचं कंबरडं मोडलं आहे.
मात्र, या सगळ्या परिस्थिती संदर्भात मोदी सत्तेत येण्यापुर्वी मनमोहन सिंह सरकारच्या विरोधात बोलत होते. मात्र, आता सर्व अभिनेते मूग गिळून गप्प बसले आहेत. मात्र, या वाढत्या महागाई विरोधात मराठमोठ्या सुबोध भावेने आवाज उठवला आहे. त्याने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली असून या पोस्ट द्वारे वाढत्या महागाईवर भाष्य केलं आहे.
काय म्हटलंय सुबोध भावे ने...
सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे,त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं.दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा.
पण आता नाही .....
कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार,बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे . हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद