मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा देण्याची मागणी; सरकारची पीटीशन मोहीम

मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभुमीवर मराठी भाषेला "अभिजात" दर्जा (Marathi language elite status) मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असून पहिल्यांदाच एक जनअभियान (Mass campaign) सुरु करण्यात आलेले असून पीटीशन मोहीमेतून राष्ट्रपतींकडे मराठी भाषेच्या दर्जासाठी मागणी करण्यात आली आहे.

Update: 2022-02-22 11:00 GMT

महारा्ष्ट्र सरकारच्या ट्विटर हॅण्डलवरुन अभिनेते सचिन खेडेकर यांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून मराठी भाषेसाठी राष्ट्रपतींना साकडे घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिजात दर्जासाठीचे निकषएखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी त्या भाषेला दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असणे आवश्यक आहे. प्राचीन साहित्यिक नोंदींसह त्या भाषेचे साहित्य हे मूळ असावे आणि दुसऱ्या भाषेतून घेतलेले नसावे असे निकष सरकारने ठरविलेले आहेत. तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे.

मराठी भाषेने अभिजाततेचे सारे निकष पूर्ण केले आहेत. मात्र, तरीही केंद्र सरकार तिला अभिजाततेचा दर्जा देण्यासाठी केवळ टाळाटाळ करत आहे. आता याविरोधात आपण जनतेच्या न्यायालयात गेले पाहिजे. त्यासाठीच आम्ही एक जनहित याचिका राष्ट्रपतींच्या दरबारी दाखल करणार आहोत. या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे. प्रत्येकाने एक पत्र पोस्ट पेटीत टाकावे. क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईंनी केले आहे.

मराठी भाषेला तात्काळ "अभिजात" दर्जा मिळण्याचा प्रश्न पूर्णत्वास नेण्यासाठी कालच मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई हे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि जी. कृष्णा रेड्डी यांची भेट घेतली आहे.

सुभाष देसाई आणि शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना महाराष्ट्रातील नामवंत लेखक, विचारवंत व मराठी कलाकार अशा अनेक मान्यवरांची स्वाक्षरी असलेले विनंती पत्र सुपूर्द केले आहे. तसेच 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा दिवस आहे आणि त्याआधी मराठी भाषेला "अभिजात" दर्जा मिळावा यावर शिक्कामोर्तब व्हावे, हा आग्रह धरल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

सुभाष देसाई म्हणाले की, आवश्यक असल्यास आम्ही उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील दूरध्वनीवरून आग्रहाची विनंती करणार आहोत, तसेच दिल्लीमधील महाराष्ट्रातील नेतेमंडळी आणि अधिकारी यांची देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या पार्श्वभूमीवर भेट घेणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी भाषेला अभिजात दर्ज देण्यात यावा अशी मागणी माराठी भाषिकांमधून होत असून, या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

अशा प्रकारे ऑनलाईन पीटीशन माध्यमातून केंद्राकडे मागणी करण्याचा हा पहीलाच प्रयत्न असून या मागणीला यश यावे अशी अपेक्षा तमाम महाराष्ट्रवासी व्यक्त करत आहेत.मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभुमीवर मराठी भाषेला "अभिजात" दर्जा (Marathi language elite status) मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असून पहिल्यांदाच एक जनअभियान (Mass campaign) सुरु करण्यात आलेले असून पीटीशन मोहीमेतून राष्ट्रपतींकडे मराठी भाषेच्या दर्जासाठी मागणी करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News