राज्यात वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 'ब्रेक दि चैन' अंतर्गत विकेंड लॉकडाउनची घोषणा केली होती. ज्यात शनिवार-रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचे आदेश काढण्यात आले होते.त्यामुळे औरंगाबाद शहरात आज सकाळपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद शहरातील पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा, निराला बाजार भागात सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळाले. तसेच अनेक भागात पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच लोकांचा प्रतिसाद दिसून आला आहे.
व्यापाऱ्यांचा विरोध
राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनला औरंगाबाद जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. अचानक दुकाने बंद करण्याच्या निर्णय घेतल्याने आम्ही जगाव कसं? असा प्रश्न व्यापारी संघटनांनी उपस्थित केला आहे. तसेच दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा सोमवारपासून दुकाने उघडण्यात येईल असा इशाराही व्यापारी महासंघाने दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात 'विकेंड लॉकडाऊन'ला लोकांचा प्रतिसादराज्यात वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 'ब्रेक दि चैन' अंतर्गत विकेंड लॉकडाउनची घोषणा केली होती. ज्यात शनिवार-रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचे आदेश काढण्यात आले होते.त्यामुळे औरंगाबाद शहरात आज सकाळपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Posted by Max Maharashtra on Saturday, April 10, 2021