जे लोक मुंडे साहेबावर प्रेम करतात ते लोक या ठिकाणी आलेत...
मुंडे साहेबांचं वादळी जीवन होतं आणि मी वादळाची लेक आहे... पंकजाताई मुंडें;
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यस्मरण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्मृतिस्थळाला भेट देऊन मुंडे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यांची कन्या पंकजा मुंडे प्रीतम मुंडे सह पुतणे धनंजय मुंडे व एकनाथ खडसे रोहिणी खडसे, महादेव जानकर त्याचबरोबर अनेक नेते मंडळी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गोपीनाथ गडावर गर्दी केली होती
यानिमित्ताने माध्यमांसोबत बोलताना पंकजा मुंडे यांच्या भावना अनावर झाल्या होत्या त्या म्हणाल्या "तीन जून माझ्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्यासाठी वाईट असेल पण माझ्यासाठी फार भावनिक दिवस आहे, आज माझ्यासाठी राजकारण शून्य दिसत आहे, आज या ठिकाणी जे लोक आलेले आहेत त्यांना मी काही दिलेलं नाही त्याचबरोबर कोणत्याही राजकारण्यांना मी इथं बोलावलेलं नाही, जे लोक मुंडे साहेबावर प्रेम करतात ते लोक या ठिकाणी आलेत अशी प्रतिक्रीया पंकजा मुंडे यांनी दिली.