कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत: भिडे

Update: 2021-04-08 08:42 GMT
कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत: भिडे
  • whatsapp icon

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. सध्या देशात कोरोना महामारीमुळे लोकांचा मृत्यू होत असताना भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

"मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोना हा मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.'' असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी म्हटलं आहे. मागे एकदा सांगली जिल्ह्यातील आळसंद या गावात आमदार अनिल बाबर तसेच संभाजी भिडे एका दुकानाच्या उद्घाटन समारंभासाठी एकत्र आले होते. यावेळी भिडे यांनी खानापूर आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांना आधी मास्क काढा आणि मग उद्घाटन करा असे फर्मावले.

आमदारांनी हा आदेश मानत स्वतःच्या तोंडावरचा मास्क उतरवला. गर्दीत होत असलेल्या या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी मास्क घातलेला नव्हता. व त्यांनी आमदारांना घातलेला मास्क देखील उतरवायला लावला होता. एकीकडे कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या चिंतेने महाराष्ट्र चिंतेत आहे. महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करून या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. चौकाचौकात पोलीस मास्क नसलेल्या नागरिकांवर दंड आकारत आहेत. भिडे यांनी आमदाराला मास्क काढून उद्घाटन करायला लावणं योग्य आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

Tags:    

Similar News