लोकांनी सरकारपासून म्हणजेच राजकारणापासून दूर राहून काम केले तर देशाचा विकास होऊ शकतो, त्यामुळे माझा सल्ला आहे की तुम्ही सरकारपासून लांब राहा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकीर यांनी केले आहे. वर्धा मंथन २०२१ या कार्यक्रमात ग्राम स्वराज की आधारशीला या परिसंवादात ते बोलत होते. खेडी आत्मनिर्भर झाली तर देश आत्मनिर्भर होईल, त्यामुळे खेड्यांकडे चला असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.