Video: पुण्यात रेमडीसीवीरसाठी लोकांचं आंदोलन

Video: पुण्यात रेमडीसीवीरसाठी लोकांचं आंदोलन people protest for remdesivir in pune district;

Update: 2021-04-12 09:00 GMT


राज्यात रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात आज राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. तरीही राज्यात रेमडीसीवरचा पुरवठा सुरळीत होत नसल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातील रविवार पेठेतील पोतनीस दवाखान्यात रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्यानं लोकांनी आंदोलन केलं. पुरेसा साठा हा प्रशासनाकडे उपलबध नसल्याने लोकाचे जीव टांगणीला लागले आहेत. आपल्या नातलगांचे जीव वाचावे म्हणून नातेवाईक 8 ते 10 तास थांबून पण रेमडीसीवीर मिळत नाही. म्हणून संतप्त नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं.

Tags:    

Similar News