पुणेकरांनो थोडी कळ सोसा…, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं आवाहन
कोव्हिडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे ही महानगरे हॉटस्पॉट होती. पुण्याची परिस्थिती पूर्वपदावर यायला बराच काळ लागला होता. अजूनही पुण्यातील परिस्थिती म्हणावी तशी नियंत्रणात नाही. त्यामुळे पुणेकरांनी थोडी कळ सोसायला हवी, असं आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.;
कोव्हिडचा प्रसार रोखण्याकरीता काही निर्बंध कडक करावे लागतात. मागच्या लाटेत पुणे, ठाणे, नागपूर आणि मुंबई ही महानगरे हॉटस्पॉट होती. पुण्याची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी बराच वेळ लागला होता. पुण्यात कोव्हिडचा प्रसार व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे पुणेकरांना काही काळ थोडीशी कळ सोचावी लागेल. त्यांनाही निर्बंधांमध्ये शिथिलता देऊ, असं विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना आवाहन केलं आहे.
तिसरी लाट
तिसरी लाट मोठी असेल असं तज्ज्ञांचं भाकीत आहे. तसंच आताची परिस्थितीही सर्वकाही सुरू करावं अशी नाहीये. त्यामुळे मोठ्या शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता देताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. याबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, असं ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी मुंबई लोकलबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं.
पुणे तिसऱ्या लेव्हलमध्ये
कोव्हिडची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोव्हिड आटोक्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आज नवे कोव्हिड-१९ प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. या नियमांमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलाय. तिसऱ्या लेव्हलमधील नियमांनुसार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत.