ओमिक्रॉन व्हेरीएन्टने जगाला धडकी भरवली असताना आता या नवीन व्हेरिएन्टचा संसर्ग झालेले ८ पेशंट महाराष्ट्रातही आढळले आहेत. या सर्व रुग्णांना कोणताही गंभीर त्रास होत नसला तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. पण अजूनही अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसते आहे. कार्ला येथे एकविरा देवी मंदिर परिसरातही भाविकांची गर्दी आहे. पण इथे कोरोनाच्या नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...