सातारकरांसाठी टोलमाफी झालीच पाहिजे : आ.शशिकांत शिंदे
साताऱ्यातील महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून ते दुरुस्त करा आणि सातारकरांसाठी टोलमाफी करा अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
सातारा : साताऱ्यातील महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून ते दुरुस्त करा अशी आक्रमक भूमिका मांडत आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोल बंद करण्याची मागणी केली होती. त्या आंदोलनात आता विधानपरिषदेचे आ.शशिकांत शिंदे यांनी देखील उडी घेतली आहे. सातारकरांना टोलमाफी करण्यासाठी मोठं जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मत आ.शशिकांत शिंदे यांनी म्हंटले आहे.यासाठी कोणीही पुढाकार घ्यावा, अगदी सर्वपक्षीय आंदोलन झाले तरी त्यात आपण सहभागी होऊ असं आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.
या महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट झाले असून , त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली पाहिजे असं आ. शिंदे यांनी म्हटलं आहे.
सोबतच एकट्याने आंदोलन केल्यास त्याला वेगळं वळण लागते त्यामुळे सातारकरांसाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.