लॉकडाऊनच्या आधी बाजारात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

लॉकडाऊनची चर्चा असल्याने आता पूर्वतयारीसाठी लोकांनी अनेक ठिकाणी बाजारात गर्दी केली आहे. लॉकडाऊनचा हेतूच अयशस्वी होत असल्याचे यावरुन दिसते आहे.

Update: 2021-04-03 05:59 GMT

वर्धा : जिल्ह्यात शनिवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी सूंपूर्ण बाजारपेठ बंद असणार आहे. फक्त अत्यावश्यक सुविधा या संचारबंदीमध्ये सुरू असतील. त्यामुळे नागरिकांनी वर्ध्याच्या बाजार समितीमध्ये शनिवारी सकाळी मोठी गर्दी केली होती. एवढेच नाही तर वाहतूक किमान अर्ध्या तासाठी ठप्प झाली होती. हे भाजी मार्केट शहरातील बजाज चौक या परिसरात होते. मात्र तिथे वाहतूक कोंडी आणि सोशल डिस्टन्सिंग शक्य नसल्याने भाजी मार्केटचे स्थलांतर एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आले होते. मात्र आता एपीएमसी मार्केटमध्ये सुद्धा नागरिकांची गर्दी झाल्याने इथेही कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी झाल्याचे चित्र आहे.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स, नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, त्याचबरोबर वीकेंड संचारबंदी असे उपाय योजले जात आहेत. मात्र हे सगळे असतानाही नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसते आहे.

 यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी नागरिकांना विचारले तेव्हा, संचारबंदी लावण्यापेक्षा ज्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत त्या राबवा.... असे आवाहन त्यांनी केले आहे.

Similar News