धक्कादायक! कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांनी करून आणला बाजार
बाजारातून फळ आणि पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स केला खरेदी;
बीड: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत असताना,नागरिकांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्ण बिनधास्तपणे शहर भरात फेरफटका मारून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वडवणी इथल्या कोविड सेंटर मधील तीन पॉझिटिव्ह रूग्णांनी शहरभरात फेरफटका मारला. हे रुग्ण केवळ शहारत फिरलेच नाही तर यांनी बाजारातून फळ आणि पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स देखील खरेदी केला आहे.त्यांचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आपला जीव धोक्यात घालून आरोग्य विभाग रूग्णांवर उपचार करत असताना, असे काही रुग्णच जर बेजबाबदारपणाने वागत असतील तर कोरोना आटोक्यात येणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.