ऐका पक्षश्रेष्ठींनो.... नाहीतर मला फासावर लटकवा! काँग्रेस कार्यकर्त्याचं अजब आवाहन
राजस्थान मध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोघांमध्ये द्वंद्व सुरू आहे. अशात काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवा तरीही जर २०२३ मध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही तर मला फासावर लटकवा अशी मागणीच काँग्रेस पक्षश्रेष्ठींक़डे केली आहे.
काँग्रेस पक्ष सध्या अनेक चढ उतारांमधून जातोय. पक्षात अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी होणं अपेक्षित होतं परंतू सारं काही राजकारण घडतंय ते राजस्थानमध्ये. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेले राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि युवा नेतृत्व असलेले सचिन पायलट यांच्यातील रस्सीखेच पुन्हा एकदा समोर आली आहे.
अध्यक्षपदाचे उमेदवार झाल्यानंतर गेहलोत यांनी मुख्यमंत्री पद सोडणं पक्षाला अपेक्षित होतं आणि सचिन पायलट यांना उर्वरीत काळासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची रिकामी करणं अपेक्षित होतं परंतू तसं काही अजुनही झालेलं नाही. गेहलोत यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या गटातील तब्बल ९२ आमदारांनी राजीनामे देण्याची घोषणाच केली. या सर्वांचा सचिन पायलट यांना विरोध दिसुन येत आहे. या गटाशी चर्चा करण्यास काँग्रेसने मल्लिकार्जून खर्गे यांना राजस्थानमध्ये पाठवलं आहे.
आता दुसरीकड़े सचिन पायलट यांचे देखील समर्थक फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने त्यांची मागणी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची राहिली आहे. अशाच एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पक्षश्रेष्ठींना ट्विट करत आवाहन केलं आहे. "ऐका पक्षश्रेष्ठींनो, राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनाच मुख्यमंत्री करा. यानंतर २०२३ मध्ये जर काँग्रेसची सत्ता आली नाही तर मला भर चौकात फासावर लटकवा, मी काँग्रेसचाच एक कार्यकर्ता आहे.", असं म्हणत त्याने ट्विट मध्ये सचिन पायलट, राहुल गांधी, आणि प्रियंका गांधी यांना टॅग केलं आहे.
सुनो आलाकमान, राजस्थान में सचिन पाइलट को मुख्यमंत्री बना दो अगर वापस कांग्रेस की सरकार 2023 में नहीं बने तो मुझें बीच चोराये पर फांसी पर लटका देना, में कांग्रेस का कार्यकर्ता हूँ..! @SachinPilot @RahulGandhi @priyankagandhi https://t.co/TuNHQ65lKi pic.twitter.com/fe7ETZGs6L
— Manoj Tomar (@manojtomarup81) September 27, 2022
मनोज तोमर असं या कार्यकर्त्याचं नाव असून पक्षश्रेष्ठी आता त्याचं ऐकतात का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.