पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या समवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात काम बंद आंदोलन पुकारले आहे.पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केला आहे.

Update: 2021-08-25 08:29 GMT

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कालच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ज्योती देवरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान या प्रकरणावरून वेगवेगळे पडसाद उमटत असताना आज देवरे यांच्या समवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात काम बंद आंदोलन पुकारले आहे.

पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत चार दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना व मुख्य सचिवांना निवेदन दिले होते. सोबतच दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. या निवेदनात तहसीलदार देवरे यांची बदली करा अन्यथा आमची बदली करा अशी मागणी करण्यात आली होती.

दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार सध्या ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाच्या दारातच हे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी गेले असता त्या भावनिक झाल्या. मात्र एका महिलेच्या विरोधात एवढ्या लोकांना एकत्र यावं ही विचार करायला लावणारी गोष्टी आहे असं त्या म्हणाल्या, सोबतच जरी माझ्या सहकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले असले तरी कामावर त्याचा परिणाम झालेला नाही असं त्या म्हणाल्या. सोबतच अजूनपर्यंत माझ्याकडे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे निवेदन आलेले नाही तोपर्यंत त्यावर मी भाष्य करणार नाही असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Tags:    

Similar News