संसदीय समितीने ऑक्सिजन संदर्भात दिला होता इशारा, मोदी सरकारने दुर्लक्ष केलं, पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप

Update: 2021-04-26 13:09 GMT

आज देशात कोरोना रुग्णांने उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. हे मृत्यू रोखता आले असते का? पहिल्या कोरोनाच्या लाटेतून आपण काय धडा घेतला? या संदर्भात मोदी सरकार कोरोनाचं संकट हॅंडल करण्यात अपयशी ठरलं आहे का? या संदर्भात आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचीत केली.

यावेळी त्यांनी पहिली लाट संपल्यानंतर आपण कोरोना गेला. अशा अविर्भावात होतो. मात्र, राज्यसभेच्या संसदीय समितीने कोरोनाच्या संदर्भात अभ्यास केल्यानंतर ऑक्सिजनच्या संदर्भात इशारा दिला होता. या समितीने भविष्यात जर काही संकट आलं तर ऑक्सिजनची अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्या ऑक्सिजनच्या सुविधा निर्माण कराव्या लागतील असा इशारा दिला होता. सरकारने त्या अहवालाकडे दुर्लक्ष केलं.

त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केला आहे.

पाहा काय म्हटलंय पृथ्वीराज चव्हाण

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/3557640057673356/


Tags:    

Similar News