परमबीर सिंह यांची समृद्धी महामार्गालगत बेनामी मालमत्ता?

Update: 2021-10-12 07:41 GMT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सध्या कुठे आहेत याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. पण अजून त्यांचा पत्ता लागलेला नाही. दरम्यान परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीच्या काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये ठाण्यात दाखल असलेल्या एका तक्रारीप्रकरणी परमबीर सिंह यांचा जवळचा सहकारी संजय पुनमिया हा सध्या अटकेत आहे.

एकीकडे परमबीर सिंह यांचा शोध घेतला जात असताना आता परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. खंडणीप्रकरणी सहआरोपी असलेल्या संजय पुनमिया यांच्या नावावर समृद्धी महामार्गालगत नाशिक जिल्ह्यात शेतजमीन असल्याचे उघड झाले आहे. ही शेतजमीन परमबीर सिंग यांची बेनामी मालमत्ता असल्य़ाचा संशय व्यक्त केला जातो आहे. शेतकरी असल्याचं भासवून संजय पुनमियानं सिन्नरमध्ये शेतजमीन खरेदी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संजय पुनिमिया विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जमीन व्यवहारात परमबीर सिंग भागीदार असल्याची चर्चा आहे. दरम्यान नाशिक पोलिसांनी याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संजय पुनमिया याच्या चौकशीत अधिक माहिती पुढे येईल असे सांगितले आहे.

Tags:    

Similar News