पप्पू कलानीला 15 दिवसांचा पॅरोल मंजूर, पत्नीच्या निधना मूळे न्यायालयाने दिली परवानगी

Update: 2021-04-19 09:23 GMT

माजी आमदार ज्योती कलानी यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांचे पती पप्पू कलानी यांना पॅरोल जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज ज्योती कलाणी यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान काल त्यांच्या छातीत त्रास जाणवल्यानं तात्काळ उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७० वर्षांच्या होत्या.

ज्योती कलानी यांचे पती पप्पू कलानी तळोजा येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. पत्नी ज्योती कलानी यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना न्यायालयाने 15 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली आहे..

ज्योती कलानी यांचा राजकीय प्रवास...

ज्योती कलानी यांनी उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर स्थायी समिती सभापती, महापौर व आमदार अशी पद त्यांनी भूषवली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राजकारणात त्यांची ओळख भाभी म्हणून होती.

उल्हासनगरमधील राजकारण त्यांच्या शिवाय पूर्ण होत नव्हते. कुख्यात टाडा फेम माजी आमदार पप्पू कलानी यांच्या त्या पत्नी होत्या. पप्पू कलानी यांच्या राजकीय वलयामुळे त्या या पदापर्यंत पोहोचल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्या आजमितीला राष्ट्रवादी सोबत होत्या.

Tags:    

Similar News