पापलेट माशाला राज्य माशाचा दर्जा, पण सोशल मीडियावर बांगड्याची चर्चा

Update: 2023-09-06 07:50 GMT

अनेकांच्या पसंतीचा असलेल्या पापलेट माशाचे घटते प्रमाण पाहून राज्य सरकारने सिल्व्हर पापलेट माशाला राज्य मासा म्हणून दर्जा दिला आहे. पण सोशल मीडियावर बांगड्याची चर्चा रंगली आहे.

सिल्व्हर पापलेट माशाला राज्यमासा म्हणून राज्य सरकारने दर्जा दिला. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. त्यातच स्वाती केतकर पंडित यांनी ट्वीट करून म्हटले आहे की,पापलेट राज्यमासा झाला त्याचा आनंदच आहे, पण आता त्याचं संवर्धन करायचं म्हणजे काय ते कळेनासं झालंय. खायचा की नाही?

अविनाश उषा वसंत यांनी म्हटले आहे की, सरकार ने पापलेटला राज्यमासा बनवलाय. पण बांगडा हाच खरा राज्यमासा असला पाहिजे होता. पापलेटला स्वतःची अशी चव नसते, स्वताची चव असते बांगड्याला. कोकणात सहज कोणा गरीबाच्या घरी जरी गेलो तर बांगडा आणि भात मिळतो. पापलेट म्हणजे श्रीमंताची थेरं. कोकणातल किती लोक पापलेट खातात ते बघा विचारून.

अक्षय जाधव यांनी म्हटले आहे की, पापलेटमध्ये खरंच चव नसते आणि खूप महाग पण विकतात. त्यावर धड मास पण नसत, कसे काय पापलेट खातात लोक? त्याउलट काळा पापलेट उर्फ हलवा मच्छीला जास्त चव असते. पण मास नाही जास्त बांगडा(mackeral) मासा खायला देखील रुचकर असतो. मांस देखील असते आणि सामान्यांना परवडणारा देखील असतो मालवणी बांगडा.

बायो बुबले यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, पापलेट खाऊ नका, असं तर सरकार सुचवू पाहत नाही ना.

वैभव शेतकर यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, काल सोमवारी ‘पापलेट’ ला महाराष्ट्राचा `राज्य मासा` घोषित करण्यात आलंय. पण.. तळकोकण आणि गोव्यातल्यांच्या मनात आणि पोटात सदैव कायम स्थान आहे ते एकाच माशाचं.. तो म्हणजे.. बांगडा...

पत्रकार आशिष जाधव यांनी म्हटलं आहे की, ठीक आहे राज्यमासा पापलेट, पण बोकडाला तरी सोडा प्लीज....

एकीकडे सरकारने पापलेटला राज्यमासा घोषित केले असले तरी दुसरीकडे बांगडा माशाचीच चर्चा रंगली आहे. तसंच पापलेटपेक्षा बांगड्याला जास्त चव असल्याचे म्हटले जात आहे. पापलेट हा श्रीमंतांचा मासा असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान पापलेट राज्यमासा घोषित केल्याने मीम्सही व्हायरल होत आहेत.

Tags:    

Similar News