पंकजा मुंडे नाराज नाहीत : देवेंद्र फडणवीस

Update: 2020-11-23 10:24 GMT

औरंगाबाद येथे विधानपरीषद पदवीधर प्रचारार्थ झालेल्या पत्रकार परीषदेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं. ज्या दिवशी माध्यमांकडे बातम्या नसतात, त्या दिवशी पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात, असं ते म्हणाले.

पंकजा मुंडे नाराज असण्याचं कारणच नाही कारण मी अध्यक्ष असताना मला बोलवून दिवंगत गोपिनाथ मुंडेंनी शिरीष बोराळकर यांच नाव सूचवलं होतं. मेळाव्याला पंकजा मुंडे पोचल्या नाही म्हणजे त्या नाराज आहे असं नाही.तुम्हाला बातम्या कमी पडत सांगा त्या आम्ही देऊ पण पंकजा मुंडे नाराज आहेत अशा बातम्या चालवू नका असं फडणवीस म्हणाले. रमेश पोकळे भाजपचे उमेदवार नाहीत. त्यांनी बंडखोरी केली आहे. आम्ही सगळे भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी आहोत. भाजप शिस्तभंग समिती पोकळेंवर योग्य कारवाई करेल, असं फडणवीस म्हणाले.

Full View
Tags:    

Similar News