Panjab election Result : पंजाबमध्ये दिग्गजांचा पराभव

पंजाब विधानसभा निवडणूकीचा निकाल दिग्गजांना धक्का देणारा ठरला आहे.;

Update: 2022-03-10 14:42 GMT

देशातील पाच राज्यांची विधानसभा निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजली. त्यातच पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन, ड्रग्जचे व्यसन यासह विविध मुद्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. मात्र या निवडणूकीत धक्कादायक निकाल हाती आले आहेत. तर पंजाबमध्ये दिग्गजांचा पराभव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांचा चमकोर साहिब आणि भदौड या दोन्ही मतदारसंघातून पराभव झाला आहे. तर अमृतसरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिध्दू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. याबरोबरच शिरोमणी अकाली दलचे नेते प्रकाशसिंह बादल यांना वयाच्या 93 व्या वर्षी पराभव पत्करावा लागला. तसेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचाही दारूण पराभव झाला आहे. तसेच सुखबिंदर सिंह बादल यांचाही मोठा पराभव झाला आहे.

पंजाब निवडणूक विविध मुद्द्यांवरून गाजली होती. त्यापैकी शेतकरी आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत निर्माण झालेल्या त्रुटी यामुळे पंजाब निवडणूक गाजली होती. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चरणजित सिंह चन्नी दोन्ही जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ निकालात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचा दोन्हीही ठिकाणी पराभव झाला आहे. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणूक दिग्गजांना धक्का देणारी तर आम आदमी पक्षाला संधी देणारी ठरली आहे.

Tags:    

Similar News