गुजरातमध्ये पाकिस्तानी मासेमारी बोटीतून तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी मासेमारी करणारी एक बोट पकडण्यात आली आहे. या बोटमधून तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

Update: 2021-12-20 04:51 GMT

गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी मासेमारी करणारी एक बोट पकडण्यात आली आहे. या बोटमधून तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याबाबत संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने माहिती दिली असून ही कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने संयुक्तरित्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. 'अल हुसेनी' नावाच्या या बोटमध्ये सहा सदस्य होते.

याबनत पीआरओ डिफेन्स गुजरातने ट्वीट करत माहिती दिली.पुढील तपासासाठी ही बोट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आली होती.

याच वर्षी एप्रिलमध्ये कच्छमधील जाखाऊ किनार्‍याजवळील भारतीय हद्दीत आठ पाकिस्तानी नागरिकांसह सुमारे १५० कोटी रुपये किमतीचे ३० किलो हेरॉईन असलेली बोट पकडण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अमली पदार्थ घेऊन येणारी बोट पकडण्यात आली आहे.

Tags:    

Similar News