Padma awards 2021: पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातून कोणाचा होणार गौरव?

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्यासह महाराष्ट्रातून 6 दिग्गजांना पद्म पुरस्काराची घोषणा, वाचा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार?

Update: 2021-01-26 03:57 GMT

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यंदा 7 जणांना पद्मविभूषण तर 10 जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गृहमंत्रालयाने पद्मश्री पुरस्कारासाठी 102 व्यक्तींची निवड केली आहे.

पद्मविभूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

जापान चे माजी पंतप्रधान शिंजो आबे, गायक एसपी बालासुब्रमण्यम (मरणोत्तर), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्व तज्ज्ञ बीबी लाल, मौलाना वहीदुद्दीन खान, विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे नरिंदर सिंह कपानी (मरणोत्तर), डॉ. बेले मोनप्पा हेगड़े यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

पद्मभूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधानांचे माजी सचिव नृपेंद्र मिश्रा, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), असाम चे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर) आणि लखनऊ चे धर्मगुरु कल्बे सादिक (मरणोत्तर), गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (मरणोत्तर), रजनीकांत श्रॉफ (महाराष्ट्र), तारलोचन सिंह, चंद्रशेखर कांबरा, कृष्णन नायर शांतकुमारी

पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला?

महाराष्ट्रातून कोणाची निवड?

महाराष्ट्रातून...

सिंधूताई सपकाळ : सामाजिक कार्य

गिरीष प्रभुणे : सामाजिक कार्य

परशुराम आत्माराम गंगावणे : कला

नामदेव कांबळे: शिक्षण आणि साहित्य

जयवंतीबेन जमनादास पोपट: ट्रेड ॲण्ड इंडस्ट्री

यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर रजनीकांत देविदास श्राॅफ : ट्रेड ॲण्ड इंडस्ट्री यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Tags:    

Similar News