स्वतःची चार एकर जमीन दिली बुद्ध विहारासाठी
दानपारमितीची साक्ष देत जगन्नाथ जावळे यांनी स्वतःची चार एकर जमीन बुद्ध विहारासाठी दान केली आहे.;
संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धाला शरण जात दानपारमितीची साक्ष देत जगन्नाथ जावळे यांनी स्वतःची चार एकर जमीन बुद्ध विहारासाठी दान केली आहे.
दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशिक्षण घेत असलेले. जगन्नाथ जावळे हे धम्म सस्थेच्या कामामुळे इतके प्रभावीत झाले आहेत की त्यांनी स्वताची चार एकर जमीन पाटोदा तालुका बीड जिल्ह्यात आसलेली जमीन बुद्ध विहार बाधंण्यसाठी देण्याचे जाहीर केले आहे.
नुकतीच त्यांनी बुधवार दि. 13.09.2023. रोजी त्यांनी आंबेडकर भवन येथे सस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचें नातू डॉ. भिमराव आंबेडकर याचीं भेट घेतली. आणि आपला मनोदय जाहीर केला. सदर प्रसंगी बी. एच. गायकवाड राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विजय गायकवाड अध्यक्ष ठाणे जिल्हा. जगन्नाथ जावळे आणि त्यागमूर्ती रमाई शाखा उल्हासनगर 4 चे सरचिटणीस लक्षमण मोरे पदाधिकारी उपस्थित होते.
भिमराव आंबेडकर यांनी सर्व कागदपत्रे तपासुन पाहीली. प्रत्यक्ष जाऊन जागेची पाहणी करण्यासाठी आदेश दिले आहे.लवकरच दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया चे शिष्टमंडळ पाटोदा तालुका येथे जाण्यासाठी रवाना होईल आणि कामाला गती येईल. जगन्नाथ जावळे याचे सर्व स्तरावर अभीनदंन होत आहे.