इंडिया अलायन्सच्या 31 आणि 1 तारीखेसंदर्भातल्या तयारीला वेग आलेला आहे. भाजप विरोधकांवर ज्या प्रकारची कार्यवाही सुरू आहे, आपल्या विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकांसाठी राजकीय विरोधकांना खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची, असे सत्र सध्या भाजपच्या लोकांनी आरंभलेल असल्याची प्रतिक्रिया उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान संजय राऊत म्हणाले की "कुठलाही पक्ष इंडिया अलायन्स मधून या दबावाखालून बाहेर पडणार नाही. भाजपाच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राचे पोलीस ज्या पद्धतीने कार्यवाही करत आहेत, त्यांनी पहिलं कायद्याचं वाचन करावं. 2024 मध्ये केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येत आहे. हे या सगळ्यांनी लक्षात ठेवावं. असही संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत फोन टॅपिंग संदर्भात बोलत असताना म्हणाले की "पुरावे असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी का होऊ दिली नाही? प्रकरण का बंद केलं, आय एन एस विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली? सुषमा अंधारे जे प्रकरण बाहेर काढलं त्याची चौकशी का होत नाही?" असे अनेक प्रश्न उपस्थीत करत सत्ताधारी पक्षाला जाब विचारला आहे. "आज आम्ही जात्यात आहोत तुम्ही सुपात आहात, 2024 नंतर हे सगळं उलट होईल असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.