गेल्या काही दिवसांपासून राज्यात करुणा मुंडे विरुध्द धनंजय मुंडे वाद रंगला आहे. त्यातच करुणा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यातच करुणा मुंजे यांनी मुलांसह आझाद मैदानात सर्वांसमोर मरु, असा इशारा दिला आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. तर त्यांच्या अनेक बायका असून त्यांच्यापासून झालेले अनेक मुले आहेत, असे वक्तव्य करुणा मुंडे यांनी केले होते. मात्र त्यानंतर करुणा मुंडे यांनी पुन्हा मॅक्स वूमनशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
करुणा मुंडे यांनी कोल्हापुर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. त्यानंतर त्यांना या निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला. मात्र करूणा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांनी मॅक्स वूमनशी बोलताना अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.
करुणा मुंडे यांनी आजाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या मुलाबाळांना त्रासवून अनेकांना दोन तीन कोटींच्या गाड्या घेऊन दिल्या आहेत. त्याचा मी नक्कीच भांडाफोड करणार आहे. याबरोबरच कोणाकोणाला स्टुडियो सुरू करुन दिला आहे. त्याचाही मी भांडाफोड करणार आहे. तसेच असेही आम्ही मरल्यासारखे जगत आहोत. त्यामुळे असं जगण्यापेक्षा मी आणि माझी मुले आझाद मैदानात सर्वांसमोर मरु, असा गंभीर इशारा करुणा मुंडे यांनी दिला आहे.