उस्मानाबाद // मागील 22 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान शनिवारी उस्मानाबाद मध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद आगारातून काही बस सुरू करण्यात येत होते. दरम्यान बस सोडत असताना आगार व्यवस्थापकास मारहाण झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी दोन वाहक आणि एका चालकावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आगार व्यवस्थापक पांडुरंग पाटील हे उस्मानाबाद- तुळजापूर बस सोडत होते. यावेळी बस वाहकाला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यामुळे आंदोलनासाठी बसलेल्या इतर वाहक आणि चालकाने पाटील यांना शिवीगाळ केली.
दरम्यान वाहक दत्ता माने, शंकर पडवळ आणि चालक गणेश मंडोळे यांनी तेथे आंदोलन करण्यासाठी हजर राहून पांडुरंग पाटील यांना मारहाण करण्यात केली. तसेच पाटील यांचे कपडे देखील फाडण्यात आले व जिवे मारण्याची धमकी देऊन पाटील यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद पांडुरंग पाटील यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून,यानंतर आगारात काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले