ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात 'आरक्षण पे चर्चा' चे आयोजन

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी ओबीसी संघटनांतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. धुळ्यात देखील आरक्षण पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.;

Update: 2021-08-01 08:22 GMT

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर पुन्हा ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी ओबीसी संघटनांतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. राज्यभरात ओबीसी समाजाकडून जोरदार आंदोलने केली जात आहेत. यासंदर्भात संपूर्ण राज्यातील ओबीसी समाज संघटित करण्यासाठी अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने आरक्षण पे चर्चा या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमादरम्यान ओबीसी समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून आरक्षण पुन्हा एकदा मिळवण्यासाठी चर्चा केली जात आहे. तसेच ओबीसी समाजाच्या संदर्भातील सर्व माहिती तळागाळातील समाजबांधवांना पर्यंत पोहोचली जावी हा देखील या कार्यक्रमाचा हेतू असून, धुळ्यात देखील आरक्षण पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा पार पडली असून लवकरच न्यायालयीन लढा लढून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा एकदा प्रस्थापित केले जाईल. तसेच खासदार समीर भुजबळ हे न्यायालयीन लढाई लढत आहे आणि छगन भुजबळ हे राजकीय पटलावरची लढाई लढत आहे तर ओबीसी बांधवांनी रस्त्यावरची लढाई लढायची आहे असे मत बाळासाहेब कर्डक यांनी व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News