ठाकरे सरकारची पोलीस यंत्रणा काय करत होती? विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची ठाकरे सरकारवर टीका

Update: 2021-11-13 12:15 GMT

अहमदनगर// जी घटना घडलीच नाही त्यावरून महाराष्ट्रात दंगल सदृश परिस्थिती निर्माण होणं अत्यंत दुर्दैवी आहे मात्र , एवढे सगळं होत असताना ठाकरे सरकारची पोलीस यंत्रणा काय करत होती? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत भाजपवर टीका करणारे संजय राऊत तेंव्हा कुठे गेले होते असे म्हणत राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रविण दरेकर यांनी भेट देऊन पाहणी केली, सोबतच तारकपूर बस स्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला देखील त्यांनी भेट दिली त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

दरम्यान जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. सोबतच पोलिसांनी दबावाखाली कारवाई करत केवळ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं मात्र, खऱ्या अर्थाने जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा असं दरेकर म्हणाले. त्याचबरोबर राज्यातील फायर ऑडिट बाबत 337 रुग्णालयाचे अंदाजपत्रक पाठवले असताना अद्याप एकही रुग्णालयाचे काम सुरू नाही.आगीच्या संदर्भात एक खिडकी योजना असावी तरच लवकरात लवकर कामे होतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी रुग्णालयातील व्हेंटेलेटर बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केवळ मोदींवर टीका करण्याची सवय आहे, त्यांनी जरा राज्यात काय गोंधळ सुरू आहे त्याकडे लक्ष घालावे. साधं कोरोनाची एक लस आणू शकले नाहीत, मोदींनी देशासाठी या राज्यासाठी काय केलं ते जनतेला माहिती आहे. नको त्या विषयात राजकारण करू नका आधी हे आयसीयू कधी सुरु करता येईल ते पहा असा घणाघात दरेकर यांनी केला.

Tags:    

Similar News