शरद पवार यांच्या घरावर ST कर्मचाऱ्यांचा हल्ला, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया
राज्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी चपला फेकल्याने राज्यात वातावरण तापले आहे. तर या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप उच्च न्यायालयाच्या (High Court Decision on ST Worker Strike) निकालानंतर मिटेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी चपला फेकून निदर्शने केली. त्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. (ST Worker through a shoe on Sharad pawar home)
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी घटनेवर प्रतिक्रीया देतांना शरद पवार यांच्या घरावर केलेले आंदोलन चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच नेते कोणत्याही पक्षाचे असोत, अशा प्रकारचे आंदोलने समर्थनीय नाहीत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच फडणवीस पुढे म्हणाले, गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात. त्या ऐकून घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (Devendra fadanvis Comment on ST Worker attack on Silver oak)
इतर नेत्यांच्या प्रतिक्रीया-
घरावर हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रीया देतांना शरद पवार म्हणाले की, नेता चांगला नसेल तर त्याचा कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे मी एसटी कामगारांच्या पाठीशी आहे. परंतू चुकीच्या नेत्यांच्या पाठीशी नाही, असे सांगितले.
दिलीप वळसे पाटील (Home minister Dilip walse patil comment on attack of sharad pawar home)
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकवर चपला फेकल्यानंतर प्रतिक्रीया देतांना म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक अनिष्ठ वळण लागले ते अनुचित आहे. तसेच पुढे त्यांनी लिहीले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी आणि अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकवणारे कोण हे सर्वश्रुत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडीने कायम चर्चेचा मार्ग खुला ठेवला आहे. तसेच संविधानिक मार्गाने आणि चर्चेच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊन आंदोलनाला अनिष्ठ वळण देऊ नये, असेही यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar comment on ST worker Agitation)
एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकवर चपला फेकल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रमक होण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्याबरोबरच एसटीच्या विलिनीकरणाचे आश्वासन एसटी कामगारांच्या अधिवेशनात शरद पवार यांनी दिले होते. मग आता विलिनीकरण नाही तर किमान सातव्या वेतना आयोगासदृश्य लाभ तरी द्यायला हवे होते, असे मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊत-
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावर व्यक्त होताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे लोकशाही व्यवस्था मानणारे नेते आहेत. त्यांच्या घराबाहेर अशा प्रकारचे आंदोलन होणे हे चुकीचे आहे. आजच्या आंदोलनाचे वर्तन कोणत्याही लोकशाही व्यवस्थेतील आंदोलनाला शोभणारे नाही. या आंदोलनाच्या मागे ज्या शक्ती आहेत त्या नेत्यांचे संस्कार काय आहेत ते एकदा तपासावे लागेल, अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.