अर्थसंकल्पिय अधिवेशन गाजणार, नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून गाजणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.

Update: 2022-03-03 02:53 GMT

 राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आजपासून ( 3 मार्च) सुरूवात होत आहे. तर राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे यंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाची आजपासून सुरूवात होत आहे. तर मात्र अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेची कारवाई झाली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष असलेला भाजप आक्रमक झाला आहे. तर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांकडून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पुर्वसंधेला महाविकास आघाडी सरकारकडून ठेवण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. मात्र महाविकास आघाडी आणि घटकपक्षाचे आमदार यावेळी उपस्थित होते, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, मलिक यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे मलिक यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. परंतू मलिक यांना चुकीच्या पध्दतीने अटक झाली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे मलिक यांच्याबाबत सुनावणीनंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील. तर विरोधकांनी अधिवेशन चालवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

अधिवेशनाचे कामगाज-

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाची सुरूवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार असून त्यानंतर राष्ट्रगीताचा कार्यक्रम होईल. तसेच सभागृहाची पुढील कार्यवाही राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव पटलावर ठेवणे, राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव पटलावर ठेवणे, अध्यादेश आणि त्यानंतर 2021-22 च्या पुरवण्या मागण्या सादर करण्यासह शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. तर या अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Tags:    

Similar News