कृषी कायदे रद्द करा, सर्वपक्षीय नेत्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

Update: 2020-12-09 15:09 GMT

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी केलेला विरोध पाहता हे कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. आज विरोधी पक्षांचे प्रतिनिधी म्हणून ५ नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी, डीएमकेचे नेते टीकेएस एलोनगोवन आणि डी. राजा यांनी बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट घेतली. तसेच विरोधकांत तर्फे एक निवेदन देण्यात आले. राष्ट्रपतींना देण्यात आला या निवेदनावर वीस विविध पक्षांच्या नेत्यांच्या सह्या असून सरकारने कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे. तसंच वीज सुधारणा विधेयकही रद्द करण्याची मागणी या नवेदनात करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपतींकडे या कायद्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच संसदेमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न करता घाईने ही विधेयक मंजूर करण्यात आले, असे शरद पवार यांनी म्हटलेले आहे. तसेच विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या देखील या विधेयकामध्ये करण्यात आल्या नाही असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. भर थंडीमध्ये रस्त्यावर ती शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत, त्याची दखल केंद्र सरकारने घेऊन हा प्रश्न सोडवावा असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे. तर राहुल गांधी यांनी देखील हे अन्याय्य कायदे मागे घेतले पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आपलं भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आंदोलनातून माघार घेऊ नये असे आवाहन केलेले आहे.


Tags:    

Similar News