न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केली सभा बंदी…

Update: 2021-04-23 02:32 GMT

कोरोनाची वाढती संख्या पाहता निवडणूक आयोगाने बंगालमधील प्रचारावर बंदी घातली, केवळ 500 लोकांना सभांसाठी परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये कोणतीही सार्वजनिक रॅली, फुट मार्च किंवा रोड शो करण्यात येणार नसल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

कोव्हीड - १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला बंदी घातली आहे. देशात कोरोनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गेल्या चोवीस तासांत तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे कोलकाता उच्चन्यायालयाने योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासांनी निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. तसेच रॅली आणि रोड शो साठीची जुनी नियमावली रद्द केली असून आता फक्त ५०० लोकांसोबत सभा घेऊ शकता येणार आहेत.

निवडणुकीतील प्रचार सभा या 'सुपर स्प्रेडर इव्हेंट' होऊ शकतात. या संदर्भातल्या न्यायालयातील याचिकेवर सुनवाई मध्ये न्यायालयाने निवडणूक आयोगाविषयी कठोर शब्दात ताशेरे ओढले. अधिकार असूनही निवडणूक आयोगाने योग्य ते पाऊल उचललं नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातली कोव्हीड - १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पश्चिम बंगालचा प्रचार दौरा रद्द करून त्याऐवजी देशातील कोविड - १९ च्या परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांनी बंगाल दौरा रद्द केल्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा ही रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रचार सभा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी भाजपाने जास्तीत जास्त 500 लोकांच्या उपस्थितीत बैठका होतील. असा निर्णय घेतला होता.

Tags:    

Similar News