टोलनाक्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

Update: 2022-03-22 11:55 GMT

महामार्गांवरील टोलनाक्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. ६० किलोमीटर अंतराच्या दरम्यान केवळ एकाच टोलनाक्याला परवानगी आहे. पण अनेक ठिकाणी ६० किलोमीटर अंतराच्या आत दोन टोलनाके असल्याचे काही खासदारांनी सांगितले, त्यावर ३ महिन्यांच्या आत असे बेकायदेशीर टोलनाके बंद केले जातील, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच विरोधी खासदारांनी केलेली आणखी एक सूचना स्वीकारणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

टोलनाक्यांच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना दरवेळी टोल कर्मचाऱ्यांना आपली ओळख पटवून द्यावी लागते. यावर एका खासदाराने स्थानिकांचे आधारकार्ड टोल प्रणालीशी जोडून त्यांचा त्या परिसरातील वावर सोयीचा करता येईल, अशी सूचना केली, ती सूचना देखील नितीन गडकरी यांनी मान्य केल्याचे सांगितले. त्याचबरोबर आपण टोल जमा करटोलनाक्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणाण्याची पद्धत बदलत असल्याने अनेक टोलनाके बंद होतील असे त्यांनी सांगितले, पण याचा अर्थ टोल बंद होणार असा काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या दर्जाचे रस्ते उभे करायचे असतील, टोल आवश्यक आहे, सरकारकडे रस्ते बांधणीसाठी पैसा नाहीये, त्यामुळे टोलवसुली सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

परिवहन विभागाच्या आर्थिक मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना नितीन गडकरी यांनी २०२४पर्यंत देशातील रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांसारखे तयार झालेले असतील असा दावाही केला. तसेच श्रीनगरहून मुंबईला २० तासात पोहोचता येईल, असे रस्ते तयार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या याच भाषणात गडकरी यांनी आरटीओचे लोक आपल्यावर नाराज आहेत कारण आपण त्यांच्या १९ सेवा डिजिटलाईज केल्या आहेत, असा टोलाही गडकरी यांनी लगावला. त्याचबरोबर रस्त्यांसाठी लागणारे सिमेंट आणि लोखंड कंपन्या महाग करत आहेत, त्यामुळे आपण सिमेंट आणि लोखंडाशिवाय रस्ते तयार करता आले असते तर आपण तसेचे केले असेत असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News