एकदिवस कराची सुद्धा भारताचाच भाग असेल- फडणवीस

जनसंघ असल्यापासून प्राचीन भारत हाच अखंड भारत आहे आणि तो पुन्हा घडवायचा आहे अशी जनसंघाने नेहमीच भूमिका मांडली आहे आणि तीच भूमिका भाजप पुढे नेत आहे की काय असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने पुन्हा उपस्थित झाला आहे.

Update: 2020-11-23 14:07 GMT

औरंगाबादेत सोमवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत कराची या शब्दावरून प्रश्न विचारला असता, कराची नावाला आमचा आक्षेप नाही किंबहुना येत्या काळात कराची सुद्धा भारतात असेल अखंड भारत हे आमचं स्वप्नच आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावरून जनसंघाचे जे स्वप्न आहे ते बीजेपी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे, किमान विचार तरी करतेय असं आपण म्हणू शकतो.

वांद्र्यातील एका दुकानमालकाला इशारा देतांना, मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर 'कराची स्वीट्स' हे नाव बदला, असे शिवसेनेचे नितीन नांदगावकर म्हणाले होते. तर कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे.ही शिवसेनेची ही अधिकृत भूमिका नाही,' असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.

यावरच प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की,चांगलं आहे की राऊत त्यांच्याच पक्ष्याच्या माणसाला आता सांगत आहे. हे आधीच सांगितले असते तर त्यांनी तस स्टेटमेंट दिल नसत.आमचं तर मत अगदी स्पष्ट आहे.आम्ही फार स्पष्टपणे सांगितले की, आम्ही अखंड भारतावर विश्वास करणारे लोकं आहोत.एकदिवस कराची सुद्धा भारताचाच भाग असेल,त्यामुळे अशा नावाने काहीही फरक पडत नाही, असे फडणवीस म्हणाले तुम्ही मांडून टाका.

Full View

Tags:    

Similar News