गुणवत्ता वाढीसाठीसह पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरु...

जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी तालुका अंतगर्त येणाऱ्या जिल्हा परिषद शाळाकरीता 'एक दिवस शाळे' साठी हा उपक्रम राबविण्यात आला. नेमका हा उपक्रम काय आहे, वाचा आमचा स्पेशल रिपोर्ट...

Update: 2023-01-21 07:37 GMT

जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तालुकाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा करिता 'एक दिवस शाळे' साठी हा उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यातील १३८ शाळेत गटविकास अधिकारी भरत कोसोदे यांच्यासह पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करून प्रत्येक शाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांना भाषा आणि संख्या ज्ञान येण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात निपुण भारत उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याकरिता 'एक दिवस शाळे' साठी उपक्रमाअंतर्गत निपुण चाचणी एक व दोन च्या नोंदी आणि विद्यार्थ्यांमधील क्षमता विकसित करण्याच्या प्रयत्न केला जात आहे.

'एक दिवस शाळे' साठी या उपक्रमांतर्गत गट विकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्यात. त्या शाळेतील संपूर्ण गुणवत्ता विद्यार्थ्यांची संख्या राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासोबतचं गुणवत्ता वाढीसाठी आणि पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांनी करावयाचे प्रयत्न याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्यक्षात वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी गटविकास अधिकारी यांनी संवाद साधला. तसेचं विद्यार्थ्यााना काही प्रश्न विचारून फळ्यावर ते लिहायला व गणित सोडविण्यास सांगितले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होत असल्याने गटविकास अधिकारी कोसोदे यांनी समाधान व्यक्त केले. 

Tags:    

Similar News