10 नोव्हेंबरला एस.टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करणार- आमदार पडळकर

Update: 2021-11-05 12:54 GMT

मुंबई :  एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे , तसेच वेतन व इतर मुद्यांवरून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता भाजपने उडी घेतली असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला. येत्या १० नोव्हेंबर रोजी मुलांबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचे आमदार पडळकरांनी म्हटले आहे.

थकित वेतन, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे काही एस.टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. या आत्महत्यांमुळे एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून अनेक एस.टी कर्मचारी काही ठिकाणी आगार बंद ठेवून आंदोलन करत आहे. त्यात आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. पडळकरांनी म्हटले की, येत्या 10 नोव्हेंबर रोजी एस.टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह मंत्रालयाच्या प्रांगणात एकत्र यावे. त्या ठिकाणी उघड्यावर संसार मांडू आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

Tags:    

Similar News