एकेकाळी महाराष्ट्रात दबदबा असलेल्या शिवसेलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच संपवणार असल्याचा दावा पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहॆ. अनेक मतदार संघात शिवसेनेची ताकद असतांना राष्ट्रवादीला जागा द्यावी लागते एवढी नामुष्की शिवसेनेवर कधी नव्हती . मुख्यमंत्री म्हणून उद्धव यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेना जास्त मार्क नक्की द्यावे लागतील. मातोश्री वर पैसेवाल्याना तिकीट दिलं जातं असा गंभीर आरोपही गुलाबराव पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्र ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले आहॆ.