केंद्र आणि राज्यसरकारच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने तिवसामध्ये होलिका आंदोलन
अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या तिवसा मतदारसंघातील तिवसा येथे युवक काँग्रेस व तिवसा तालुका व शहर युवक काँग्रेसच्या यांच्य वतीने भव्य निषेधार्थ आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनात होलिका दहन करतांना देशाला देशोधडीला लावणाऱ्या असंवेदनशील सरकारचे लक्ष वेधण्यासाठी होलिका आंदोलन करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकार यांचे अन्यायकारी धोरण, वाढती महागाई, इलेक्टोरल बॉण्डच्या नावाखाली केलेली भ्रष्टाचार, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या आणि सर्वसामान्यांची स्वप्ने उध्वस्त करणाऱ्या, जुलमी सरकारच्या विरोधात असणारी ही होळी आहे, अशा तीव्र भावना या आंदोलकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी तिवसा तालुका व शहर काँग्रेस तथा युवक काँग्रेसने पेटवलेला हा अंगार आहे, संविधान व लोकशाही रक्षणासाठी पुकारलेला एल्गार होता, असं आंदोलक म्हणाले.
देशाची व राज्याची कोलमडलेली अर्थव्यवस्था तथा आरोग्य यंत्रणा, मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचा न सुटलेला तिढा, दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतांना तो घोषित न करणे, वाढती गुन्हेगारी, वाढती महागाई , वाढती बेरोजगारी, उद्योजकांचे लाखो कोटींचे कर्ज माफ तर शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकणारे सरकार, आपल्या राज्यातील उद्योग गुजरातला पळविणारे केंद्र सरकार, ईडी सीबीआय सीआयडी , इनकम टॅक्स चा धाक दाखवत करणारी पक्षफोडीचे राजकारण, मणिपूर सारख्या मानवी अत्याचाराच्या घटना, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर हिंसक अत्याचार, कायद्याचा गैरवापर यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ असून याच्या निषेधार्थ तथा केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील मिंधे सरकारच्या चुकीच्या धेय्यधोरणाविरोधात तथा लोकशाही व संविधानाच्या विरोधात गळचेपी करणाऱ्या हुकूमशाही सरकारची होळी करून येत्या निवडणूकांमध्ये जागा दाखविण्यासाठी तिवसा विधानसभा युवक काँग्रेस व तिवसा तालुका व शहर युवक काँग्रेसच्या वतीने भव्य निषेधार्थ आंदोलन केले असून या आंदोलनात होलिका दहन करतांना देशाला देशोधडीला लावणाऱ्या असंवेदनशील सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे होलिका आंदोलन करण्यात आलं असल्याचं आंदोलकांनी सांगितलं.
या आंदोलनानिमित्त सर्वश्री तिवसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीशभाऊ पारधी ,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सेतूभाऊ देशमुख, नगराध्यक्ष योगेश वानखडे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे , पंकजभाऊ देशमुख, खरेदी-विक्रीचे संचालक लोकेश केणे, महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे सचिव रितेश पांडव, नगरसेवक अमर वानखडे , माजी सरपंच अतुलभाऊ गवड, शहर काँग्रेस कार्याद्यक्ष सुनिलभाऊ बाखडे, सतिशभाऊ गौरखेडे, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने ,गटनेते किसन मुंदाने ,खरेदी-विक्री संचालक प्रमोदराव देशमुख , नगरसेवक नरेश लांडगे, माजी नगरसेवक दिवाकर भुरभुरे, छत्रपती डोंगरे, अंकूश देशमुख, स्वप्नील गंधे, अक्षय पवार, अनिकेत तालन, वैभव काकडे ,संजय चौधरी, उमेश राऊत, सागर राऊत, अनिकेत प्रधान, आकाश मकेश्वर, धिरज ठाकरे, तुषार लेवटे, दीपक पावडे ,राज निकाळजे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित उपस्थित होते.