Lonavala Bus accident : खासगी बसचा अपघात, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मदत

Bus accident : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोरघाट येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली.;

Update: 2023-04-15 06:52 GMT

Old Pune Mumbai Highway : जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर रायगड (Raigad) जिल्ह्यातील बोरघाटाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातात (Bus Accident) 12 प्रवाश्यांचा मृत्यू झाला. तर 25 पेक्षा अधिक गंभीर जखमी आहेत. त्यामुळे या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या कुटूंबियांप्रति सहवेदना व्यक्त करत मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी फोनवरून चर्चा करत माहिती जाणून घेतली. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देश दिले. या अपघातानंतर तातडीने मदतकार्य करणाऱ्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतूक केले.

अपघातात नेमकं काय घडलं? 

पुण्यावरून मुंबईला जाणारी खासगी बस जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून भरधाव वेगाने दरीत कोसळली. यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25 जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. (Bus falls into ravine on Mumbai-Pune route; 8 people died)

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस पुणे येथून मुंबईला निघाली होती. ही बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून (Mumbai Pune Highway) जात असताना लोणावळ्याजळील बोरघाटातील (Borghat bus Accident) शिंगरोबा मंदिराजवळ भरधाव वेगाने दरीत कोसळली. या बसमध्ये 41 लोक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींना मदत पोहचवण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पोलिसांकडून मदतकार्य सुरु आहे.


Tags:    

Similar News