भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर खासदार रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह शब्द

Update: 2021-01-27 18:27 GMT

एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत भाजपच्याच एका अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. bjp.Org या वेबसाईटवर भाजपच्या खासदारांचे फोटो आणि त्याखाली त्यांची नावे देण्यात आलेली आहेत. पण खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत त्यांच्या नावाच्या खाली एक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आला होता.



 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून याचा निषेध केला आणि एका राज्याच्या एका महिला खाषदाराबाबत अशा पद्धतीने आक्षेपार्ह शब्द लिहिला जाणे योग्य नसल्याचे म्हणत भाजपाने यामागे कोण आहे हे शोधून कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्राचा सायबर क्राईम विभाग याचा शोध घेऊन कारवाई करेल, असा इशाराही दिला. यानंतर काही वेळाने भाजपची ती वेबसाईट अपडेट करण्यात आली आहे आणि आता रक्षा खडसे यांच्या नावापुढील तो आक्षेपार्ह शब्द काढण्यात आला आहे.

भाजपमधून नाराज होऊन एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. पण रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून त्या भाजपमध्येच आहेत.

अशा पद्धतीने भाजपच्या एका महिला खासदाराबद्दल त्याच पक्षाच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह शब्द येण्यामागे कोण आहे याचा शोध घेऊन पक्ष त्यावर कारवाई करेल का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



 



Tags:    

Similar News