भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या संरक्षणात तैनात असलेल्या 31 वर्षीय NSG कमांडो पोरेश बिरुली यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारेश हे दिवाळीसाठी तीन दिवसांच्या रजेवर 3 नोव्हेंबरला घरी पोहोचले होते.
पोरेशनेही घरी आल्यावर दिवाळीनिमित्त आपल्या कुटुंबीयांसह फटाके फोडले, त्यानंतर तो चुलत भावासोबत मोटारसायकलवरून मित्राला भेटायला गेला असता, चाईबासा रेल्वे ओव्हर ब्रिजवर रात्री 10 ते 11 च्या दरम्यान अपघात झाला. या घटनेवेळी मामाचा मुलगा राजा तियूही त्यांच्यासोबत होता. भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील दोघांना धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
पोरेशच्या कुटुंबीयांनी आज शुक्रवारी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोरेश यांना दोन मुली आहेत. एकीचे 7 वर्ष तर दुसरीचे वय 4 वर्ष आहे. पोरेश बिरुली यांची पत्नी झारखंड स्टेट लाइव्हलीहुड प्रमोशन सोसायटीमध्ये प्रोग्राम ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.
एनएसजी कमांडो पोरेश यांच्या पत्नीने सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी त्यांचे पती तीन दिवसांच्या सुट्टीवर घरी आले होते. थोडा वेळ घरात राहिल्यानंतर मामाच्या मुलासह ते घराबाहेर पडले. रात्री दहा वाजता त्याच्याशी फोनवर बोललो, काही वेळात घरी परत येऊ असे सांगितले. पण रात्रभर काहीच माहिती मिळाली नाही. सकाळी अपघाताची माहिती मिळाली.
त्यांना सांगण्यात आले की, दोन्ही दुचाकीस्वार उड्डाणपुलावरून जात होते, त्यादरम्यान भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिली. दोघांनी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दिवाळीच्या रात्री शहरात जड वाहनांना नो एंट्री असताना हा अपघात झाला. रात्री जड वाहनांसाठी नो एंट्री ठेवण्यात आली होती. असे असतानाही रस्त्यावरील चेकपोस्टवर तैनात असलेले पोलिस पैसे घेतात आणि अवजड वाहनांना नो एंट्रीमध्ये बेकायदेशीरपणे वाहने सोडण्यास परवानगी देतात. त्यामुळं ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.