भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना नोटीस

Update: 2022-02-09 12:31 GMT

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या आयोगासमोर विविध लोकांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. त्यामुळे या आयोगापुढे साक्ष देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

१ जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. कोरेगाव भिमा या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल होते. तर या परिसराला दंगलीचे स्वरुप आले होते. याप्रकरणात अनेक गुन्हे देखील दाखल झाले होते. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे. तर त्यांच्यासह रविंद्र सेनगावकर आणि संदीप पखाले यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

१ जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक आले होते. त्यावेळी झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. तर शरद पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचाराला संभाजी भिडे यांचे वक्तव्य कारणीभूत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणात Adv. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. तर त्यासाठी शरद पवार यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. मात्र यापुर्वी शरद पवार यांना जुलै महिन्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 23 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

Tags:    

Similar News