भारताची एक इंचही जमीन चीनला घेऊ देणार नाही : संरक्षणमंत्री

भारत आणि चीन सीमेवर सध्या शांतता असून दोन्ही देशांमधे वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा सुरू असून कालपासून सीमेवर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारताची एक इंच जमीनही चीनने ताब्यात घेऊ देणार नाही, असा असा दावाही राजनाथ सिंह यांनी आज संसदेत केला.;

Update: 2021-02-11 09:56 GMT

भारत चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीव संसदेत वादळी चर्चा अपेक्षीत असताना आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन करत सीमेवर लढणाऱ्या शुर जवानांच्या पाठीशी देशानं उभं राहवं असं आवाहन केलं.

भारत-चीन नियंत्रण रेषेवर (एलएसी) शांततापूर्ण स्थिती काय ठेवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. भारतानं नेहमीच द्विपक्षीय संबंध कायम ठेवण्याचा आग्रह केला आहे, असं यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं.

देश कोरोना संकटाशी लढत असताना एलएसीवर चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी आपल्या जवानांनी बलिदान दिलं आहे. आम्हाला विश्वास आहे की हा वाद चर्चेद्वारे सोडवला जाऊ शकतो. त्यामुळेच चीनशी वाटाघाटी सुरू असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी संसदेत सांगितलं.

Full View


सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम झाला होता. म्हणूनच दोन्ही देशांच्या सैनिकांनी आपली पावलं मागे घेणं आवश्यक आहे. आम्ही कुणाला एक इंचही जमीन देणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेस सैन्य मागे घेण्याचं दोन्ही देशांकडून मान्य करण्यात आलं आहे. कालपासून सीमेवर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.सैन्याकडून माघार घेतल्यानंतर उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा सुरू आहे. करारानंतर ४८ तासांच्या आत दोन्ही देशांचे कमांडर एकमेकांची भेट घेतील, असंही सरंक्षण मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. भारत आणि चीनने घेतलेल्या निर्णयानुसार, एप्रिल २०२० पूर्वीची स्थितीवर निर्माण करु.

जी काही बांधकामं करण्यात आली आहेत ती देखील हटवली जातील. या दरम्यान ज्या सैनिकांनी देशासाठी जीव गमावला, त्यांना देश नेहमीच सलाम करेल. मला खात्री आहे की देशाच्या सार्वभौमत्वाच्या मुद्दयावर संपूर्ण सभागृह एकत्र उभं आहे, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

सरंक्षणमंत्र्याचे निवेदन संपल्यानंतर सदस्यांनी याविषयावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी आग्रह धरला होता. परंतू हा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा असून अद्याप दोन्ही देशांमधे चर्चा सुरु आहे, त्यामुळे सभागृहात चर्चा करु नये असे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंनी सांगितले.

Tags:    

Similar News