कोरोनाचा कहर : मरण झालं स्वस्त..सरण झालं महाग
राज्यात कोरोना परिस्थिती अक्षरशः भयावह होत चालली आहे...अऩेक ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठीदेखील जागा मिळत नाहीये. पाहा आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट....
राज्यात कोरोना परिस्थिती अक्षरशः भयावह होत चालली आहे....ज्याप्रमाणे इतरदेशांमध्ये सध्या कोरोना मृत्यूची संख्या वाढत असल्यामुळे दफन करण्यासाठी जागा नाही, असेच काहीसे दृश्य महाराष्ट्रात समोर येऊ लागले आहे.... औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.... गुरुवारी शहरातील एन 11 भागातील एकाच स्मशान भूमीत तब्बल नऊ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले..तर दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर कोरोनाने मृत्यू झालेल्या आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले...
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यात 400 पेक्षा जास्त कुरूना बाधितांना आपला जीव गमवावा लागला... त्यामुळे शहरातील स्मशान भूमी वर अंत्यसंस्कार करण्यासाठी ताण पडू लागला आहे... अशातही काही बचतगट आपला जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करण्याचे काम करतायत.. असं म्हणतात की,ज्याच्या अंत्यसंस्कारावेळी जेवढी जास्त गर्दी त्याने आपल्या आयुष्यात तेवढी माणसं कमावली... पण आता कोरोनाच्या संकटाने तीही माणुसकी संपवली आहे.