भाजप आमदाराच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कारवाई होणार का?

कोरोना संदर्भातल्या नियमांची कम कडक अंमलबजावणी सध्या केली जात आहे, पण हे नियम फक्त सर्वसामान्यांसाठी आहेत का आणि राजकारण्यांना यातून सूट देण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे.;

Update: 2020-12-21 02:30 GMT

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. यानुसार सर्वसामान्यांना हे नियम पाळून आपले सर्व कार्यक्रम आयोजित करावे लागत आहेत. पण राजकारण्यांना मात्र या नियमामधून सूट देण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे कारण आहे भाजपच्या एका आमदाराचा शाही लग्न सोहळा आणि आश्चर्य म्हणजे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थिती लावली होती.

कोरोनावर औषध येईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात 50 जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे. पण सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी झाल्यामुळे मास्क न लावणे आणि सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आणि अद्याप लस आली नसताना लोकप्रतिनिधीच कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे, अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनाच नियम धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे. विवाह सोहळ्यात ५० जणांची मर्यादा पाळण्याचा नियम लोकप्रतिनिधींनीच मोडणे, हे खेदजनक आहे.

विशेष म्हणजे या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील अशी नेते मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





Tags:    

Similar News