गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होतं. या उपोषण ठिकाणी मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी आज भेट दिली. जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपासून पाणी घेणं देखील बंद केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस घेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे.
काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील
दरम्यान यावेळी जरांगे पाटील म्हणाले की "मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. राज्यातील मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांच्याकडून आशा आहे. माझ्या पोरांचा घास काढू नका, सरकारला आणखी 10 दिवस वाढवून देतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासह इतर निर्णय धाडसाने घेतले आहेत. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही. शिंदे साहेबांनाही हटू देणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.